प्रेमा तुुझा रंग वेगळा…

सूर्य पश्‍चिमेकडे झुकत होता. सायंकाळच्या सावल्या वेध घेत गडद होत चाललेल्या होत्या…तरी तो वाट पाहत उभा होता. त्याला आवडणार्‍या एका मुलीची…मुलीची नव्हे, त्याच्या बहुरत्ना वसुंधरेची… नुकतेच तिने सोळाव्या वर्षांत पदार्पण केले होते. दिसायला चारचौघीत उठून दिसेल एवढेच सौंदर्य तिच्याजवळ होते. तिची रहाणी एकदम साधी…त्यात बडेजाव नव्हता…ती शिक्षण घेत होती…सुशील, समजूतदार असे तिच्या स्वभावाचे गुण होते. […]